Thursday, October 17, 2019

Bird Info

गाय बगळा

मराठी नाव :- गाय बगळा,ढोरबगळा, गोचिडखाऊ
इंग्रजी नाव :- Cattle egret
शास्त्रीय नाव :- Bubulcus ibis

माहिती :- हा मध्यम आकाराचा बगळा असून मुख्यत्वे गायी म्हशीचे कळप जिथे असतात तिथे वावरत असतो. या कळपांच्या सानिध्यात राहून तो गायी म्हशीकडे आकर्षित होणारे किडे खातो. अशा प्रकारे एक प्रकारचा सह अधिवास जपला जातो. म्हणूनच या बगळ्याला गाय बगळा म्हणतात.
दिसायला लहान बगळ्यासारखा पूर्णपणे पांढरा असला तरी या बगळ्याला गळ्यापाशी थोडासा पिवळा रंग असतो व वीणीच्या हंगामात हा पिवळा रंग अधिक गडद होतो. ईतर वेळेस साध्या लहान बगळ्यात व गाय बगळ्यात फरक शोधणे अवघड जाते. लहान बगळ्याची चोच काळी असते तर गाय बगळ्याची चोच पिवळी असते.

- वाघमोडे यांचा दौलतराजे, बनगरवाडी.

1 comment: