कोतवाल
मराठी नाव :- कोतवाल
इंग्रजी नाव :- Black drongo
शास्त्रीय नाव :- Dicrurus macrocercus
माहिती :- कोतवाल हा संपुर्ण काळ्या रंगाचा, चपळ पक्षी आहे. लांब दुभंगलेली शेपटी हे याचे वैशिष्ट्य, नर व मादी हे दिसायला सारखेच असतात. कोतवाल पक्षी साधारण 30 ते 31 सें. मी. आकाराचा असतो.
हे पक्षी स्वसंरक्षणार्थ कावळे, ससाणे यासारख्या हिंस्त्र पक्षांच्या मागे लागुन त्यांना पळवून लावतात. म्हणुन यांच्या आश्रयाने इतर लहान मोठे पक्षी आपले घरटे बांधतात यां कामावरून यांचे नाव कोतवाल पडले असावे.
हे पक्षी एकट्याने किंवा लहान मोठ्या थव्याने शेतीच्या भागात आणी मोकळ्या मैदानी प्रदेशात राहणे पसंत करतात. सहसा विजेच्या तारावर किंवा गुरांच्या कळपात राहुन विविध कीटक पकडून खाताना दिसतात. हा पक्षी कीटकभक्षी असुन कीटक, फुलांतील मध आणी क्वचित लहान पक्षी हे याचे खाद्य आहे. याचे घर जमिनीपासून 5 ते 10 मीटर उंच झाडांवर खोलगट, काटक्यानी बनलेले असते. मादी एकावेळी 3 ते 5 अंडी देते अंडी पांढऱ्या रंगाची असुन त्यावर भुरकट तपकिरी ठिपके असतात.
- आपलाच वाघमोडे यांचा दौलतराजे, बनगरवाडी.
No comments:
Post a Comment