Thursday, June 3, 2021

भारतीय करवानक


भारतीय करवानक 
मराठी नाव :- भारतीय करवानक
इंग्रजी नाव :- Indian stone curlew or Indian thick knee
शास्त्रीय नाव :- Burhinus indicus


माहिती :-  याचे डोळे मोठे असुन पिवळ्या रंगाचे असतात. याचा रंग तपकिरी करडा असुन यावर वाळुसारखे ठिपके असतात. याचे पाय कडक असुन गुडघे जाड असतात. त्यामुळे हे "जाड गुडघा" गटात मोडतात.

      हे करवानक मुख्यतः पहाटे आणी संध्याकाळी सक्रीय असतात. दिवसा ते झुडुपाच्या सावलीत स्थिर उभे आढळतात. कोरडी पानगळ होणारी जंगले आणी काटेरी जंगलात यांचा अधिवास आढळतो.
      यांचा प्रजनन हंगाम मुख्यतः मार्च ते एप्रिल असतो, मादी 2 ते 3 दगडी रंगाची अंडी घालते. यांचे मुख्य अन्न कीटक, आळ्या व छोटे सरपटणारे प्राणी असतात.

-वाघमोडे यांचा दौलतराजे, बनगरवाडी.



No comments:

Post a Comment