Monday, June 7, 2021

पोपट

पोपट

मराठी नाव :- पोपट
इंग्रजी नाव :- Alexandrine parakeet
शास्त्रीय नाव :- Psittacula eupatria 


माहिती:- पोपट कुलातील तसेच भारतीय उपखंडात सापडणाऱ्या जातीपैकी हां एक मध्यम आकाराचा पोपट आहे. याचा आकार जवळपास 55 ते 65 सें. मी. च्या दरम्यान असतो. हा साधारण 200 ते 300 ग्राम वजनाचा असतो. याचा संपुर्ण रंग हिरवा असुन गळ्याभोवती करडा लालसर गोल अशी रिंग असते तसेच पंखावर लालसर रंग असतो. याची शेपटी 25 ते 30 सें. मी. इतकी लांब असते. 

       हा जंगल, शेत शिवार तसेच खारफुटी जंगलाच्या अधीवासात आढळतो. छोट्या आकाराच्या ढोलीत राहत असुन याचे मुख्य अन्न पीकलेली फळे, बिया, कळ्या तसेच कठीण कवचाची फळे आहेत. याची मादी 2 ते 4 पांढऱ्या रंगाची फळे अंडी घालते, अंडी साधारण 24 दिवसात उबवली जातात, याचा वीणीचा हंगाम हा नोव्हेंबर ते एप्रिल असा असतो.याला मुख्यत्वेकरून घरामध्ये पाळले जाते तसेच बोलायला देखील शिकवले जाते, ही एक पाळीव पक्ष्यांची जात आहे.

-वाघमोडे यांचा दौलतराजे, बनगरवाडी.

No comments:

Post a Comment