मीरगाच नक्षत्र साधत आला
धरणीमातेस हिरवा शालु नेसवण्या आला
पेरणीची चाहुल देण्यास आला
शेतकऱ्याच्या आशा पल्लवीत करण्या आला
परतीचा मान्सून झाला
सोबत पुर, वादळ वारा घेऊन आला
हाता तोंडाला आलेला घास घेऊन गेला
कष्ट वाया घालवण्या पाऊस आला
वळीवाचा तो अवतार आला
उरल सुरल तुडवुन गेला
वेळेचा हा खेळ सारा, नियोजनाचा बोजवारा उडाला
No comments:
Post a Comment