कोकीळ
मराठी नाव :- कोकीळ
इंग्रजी नाव :- Asian koel
शास्त्रीय नाव :- Eudynams scolopaceus
माहिती :- साधारणपणे कावळ्याएवढ्या आकारमानाचा हा पक्षी असून शेपटी लांब असते. नर काळ्या रंगाचा असून डोळे गडद लाल रंगाचे असतात. मादीचा रंग गडद तपकिरी असून त्यावर पांढरे बदामी रंगाचे ठिपके- पट्टे असतात. हा संपुर्ण भारतभर आढळतो. तसेच हा भारतात निवासी आणि स्थानीक स्थलांतर करणारा पक्षी आहे.
हा मुख्यत्वेकरून झाडावर राहणारा पक्षी असून तो दाट पाने असणाऱ्या झुडपी जंगलात, बागेत, शेतीच्या भागात आढळतो. कीटक, फुलपाखरे, सुरवंट, फळे, मध हे याचे मुख्य अन्न आहे. मार्च ते ऑगस्ट हा याच्या वीणीचा काळ असून हे पक्षी आपले घरटे बांधत नाहीत, तसेच हा पक्षी आपल्या पिलांची देखभाल करत नाही. मादी फिकट रंगाची त्यावर लालसर तपकिरी ठिपके असलेले अंडे तिला दिसेल अश्या कोणत्याही पक्ष्याच्या घरट्यात सोडून जाते.
उन्हाळ्याची चाहूल लागताच सर्वत्र कुहू-कुहू-कुहू असा आवाज ऐकू येतो. याच्या मादीचा आवाज किक-किक-किक असा असतो. हा पक्षी आपल एकुलत्या एका अंडे कावळ्याच्या किंवा डोमकावळ्याच्या घरट्यात घालतात.
- वाघमोडे यांचा दौलतराजे, बनगरवाडी.